पोटच्या मुलीची हत्या करून पित्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पिंपरी- चिंचवडच्या थेरगाव परिसरात उघडकीस आली आहे. सात वर्षीय मुलगी मृतावस्थेत आणि वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेचा अधिक तपासून वाकड पोलीस करत असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. भाऊसाहेब बेदरे (वय ४३) आणि राज नंदिनी भाऊसाहेब बेदरे (वय ७) वर्षे असं मृत वडील आणि मुलीचं नाव आहे.
हेही वाचा… वसंत मोरे म्हणतात “मी थोडासा वेळ घेतोय, पण माझी वेळ… “
हेही वाचा… पुणेकरांना खुशखबर! मेट्रोचा लोणी काळभोरपर्यंत विस्तार शक्य; लवकरच निर्णय होणार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब यांची पत्नी राजश्री या आज पहाटेच्या सुमारास गावावरून आल्या. शिवाजी नगर बस स्थानकातून पती भाऊसाहेब यांना त्यांनी फोन केला. त्यांचं बोलणं देखील झालं. मात्र ते गाडी घेऊन आलेच नाहीत. पत्नी राजश्री या थेरगाव येथील राहत असलेल्या ठिकाणी आल्या. तेव्हा त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. मुलगा आशिषने दरवाजा उघडला. मात्र वडील कुठे आहेत असं विचारलं? घरात पाहिलं असता किचनमध्ये भाऊसाहेब याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघड झालं. तर सात वर्षीय राज नंदिनी मृतावस्थेत आढळली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. भाऊसाहेब याने आधी राज नंदनीचा दोरीने गळा आवळून हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर भाऊसाहेब याने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. भाऊसाहेब याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिल्याचं समोर आलं आहे. मात्र आर्थिक विवंचनेतून ही घटना झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.