आज फादर्स डे, वडिलाचे कर्तृत्व आणि केलेल्या कष्टाचे कौतुक करण्याचा दिवस. मात्र वयाच्या चौदाव्या वर्षापासून काम करणाऱ्या प्रणव यंदे याची कहाणी काहीशी वेगळीच. आई-वडिलांसोबत राहात असतानाही त्याला तीन ठिकाणी काम करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतोय. मात्र अशाप्रकारे दिवस-रात्र काम करणाऱ्या प्रणवला आजही वडिलांविषयी तितकाच आदर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी चिंचवड मधील प्रणव यंदे हा होतकरू मुलगा आहे. कॉलेज करत तीन ठिकाणचे काम करून तो कुटुंबाचे पालन पोषण करत आहे. प्रणवचे वडील हे एका नामांकीत कंपनीत कामाला होते. मात्र काही कारणाने त्यांची कंपनी बंद पडली, त्यानंतर त्यांनी नोकरी केलीच नाही, त्यांच्याकडे दोन गुंठे जागा होती, व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या वडिलांनी ही जागा एका बिल्डरला दिली आणि त्याबदल्यात प्रणवच्या कुटुंबाला केवळ राहण्यापुरते घर देण्यात आले.

कुठे ही माघार न घेता आणि खचून न जात प्रणव हा गेली सात वर्षे झाले वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहे, त्याच्या दिवसाची सुरुवात ही पेपर टाकण्याच्या कामापासून होते, त्यानंतर कॉलेज करून शेजारी असलेल्या संस्थेमध्ये विद्यार्थाना पी सी बी डिझाईनचे काम शिकवतो, हे सर्व झाल्यावर घरी येऊन एका तासाचा आरामा करतो आणि परत वडापावच्या दुकानात जाऊन तो वडापाव विकतो. अशाप्रकारे तो वर्षाचे बारा महिने काम करत असतो.

एवढ्या तीन ठिकाणी काम करून त्याला जेमतेम बारा हजार रुपये महिना मिळतात. सध्या प्रणवच्या वडिलांना दिसत नसून ते घरी असतात,तर आई गृहिणी आहे. त्यामुळे या दोघांची जबाबदारी प्रणववर आहे. प्रणवही कुटुंबाची जबादारी योग्यपणे पार पाडत असून आई-वडिलांचा लहान वयातच सांभाळ करत आहे. फादर्स डे निमित्त आज प्रणवचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.

वडीलधाऱ्या व्यक्तींनी बेजबाबदार पणाने वागू नये, आपल्या जबाबदाऱ्या ओळखून स्वतः ला कुठल्याही व्यसनांच्या स्वाधीन करू नका. कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागातील एवढे उत्पन्न ठेवा, असा सल्ला फादर्स डे निमित्त प्रणव यंदे या मुलाने दिला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fathers day pranav yande hard working youngster responsibility of family