शहरातील डॉक्टरांकडे असलेल्या उपलब्ध औषधसाठय़ाची (शेडय़ूल के) तपासणी अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) करण्यात येणार असून एक एप्रिलपासून याबाबतची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. एफडीएचे आयुक्त महेश झगडे यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली.
झगडे म्हणाले, ‘‘रुग्णांना किरकोळ स्वरूपात द्यायच्या औषधांचा साठा ठेवण्याची डॉक्टरांना कायद्याने परवानगी आहे. मात्र डॉक्टरांनी ही ‘शेडय़ूल के’ औषधे कोणत्या विक्रेत्याकडून घेतली, त्या औषधांचा समूह क्रमांक काय आहे, त्यांची संख्या तसेच कोणत्या रुग्णाला कोणती व किती प्रमाणात औषधे दिली याची नोंद डॉक्टरांनी ठेवणे कायद्याने आवश्यक आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत एफडीएतर्फे १ एप्रिलपासून मोहीम सुरू करण्यात येत आहे.’’
एफडीएच्या या निर्णयाचे ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ तर्फे स्वागतच करण्यात येत असल्याचे या वेळी असोसिएशनच्या उपाध्यक्ष डॉ. माया तुळपुळे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा