लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे: सिंहगड किल्ला परिसरातील जंगलात बिबट्याचा वावर असल्याचे उघडकीस आले आहे. सिंहगडाच्या जंगलातील मोरदरवाडी भागात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

शिवगंगा खोऱ्यातील घेरा सिंहगड परिसरात बिबट्याचा वावर यापूर्वी आढळून आला होता. मोरदरवाडीतील साहेबराव यादव यांच्या बंगल्याच्या परिसरातील बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले. बंगल्यातील लहान मुलांनी मोबाइलवरुन बिबट्याचे छायाचित्र काढले. त्यानंतर मोरदरवाडीतील ग्रामस्थांना या घटनेची माहिती दिली.

हेही वाचा… आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण : पुण्यात ठाकरे गटाच्या महिला सेनेकडून किरीट सोमय्यांविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन

मोरदरवाडीत दाट जंगल आहे. या भागात यापूर्वी बिबट्याचा वावर आढळून आला होता. पावसाळ्यात बिबट्याचा वावर आढळून आल्याने ग्रामस्थांनी या घटनेची माहिती वन विभागास दिली आहे. आमदार भीमराव तापकीर यांच्याशी ग्रामस्थांनी संपर्क साधला. भांबुर्डावन विभाग आणि घेरा सिंहगड वनव्यवस्थापन समितीच्या पथकाने मोरदरवाडी भागास भेट देऊन पाहणी केली. नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.