पुणे : एका प्रसिद्ध शिक्षण संस्थेतील रोखपाल महिलेने दोन कोटी ४७ लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांकडून रोखपाल महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिक्षण संस्थेतील विभाग प्रमुखांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रोखपाल महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more: शिक्षण संस्थेतील रोखपाल महिलेकडून अडीच कोटींचा अपहार; डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल
पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे संशयित रुग्ण आढळताच राज्य सरकारनं उचललं मोठं पाऊल
पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी महिला शिक्षण संस्थेच्या बंगळुरु शाखेत रोखपाल आहे. आरोपींनी शिक्षण संस्थेतील दोन कोटी ४७ लाख रुपयांचा अपहार केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विभागप्रमुखांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत तपास करत आहेत.