पुणे : श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह व्हिआयपी लोक दर्शनासाठी भेट देणार असल्याचे पदपथावर वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल काढून घेत असताना दोन महिलांनी महिला पोलिसांना धक्काबुकी केली. गणवेशाची बटणे तोडली. एका महिलेने आंदेकरच्या ऑफीसला नेऊन तुला दाखवते मी कोण आहे ते, अशी धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
हेही वाचा >>> Ganpati Visrajan : गर्दी आणि उन्हामुळे विसर्जन मिरवणुकीत नागरिकांना त्रास; पहिल्या चार तासांत १२२ जणांवर उपचार
याबाबत महिला पोलीस शिपाई अश्विनी बनसोडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उमा राजेंद्र रणदिवे (वय ३४), रोशनी राजेंद्र रणदिवे (वय १९, रा. धनकवडी) या मायलेकीसह तीन महिलांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बेलबाग चौकातील मुळचंद दुकानाजवळ सोमवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि सहकारी पोलीस कर्मचारी सपकाळ, पोलीस हवालदार सय्यद यांच्यासह बंदोबस्तात होते. बेलबाग चौक परिसरात पदपथावर वस्तुंचे स्टॉल काढून घेत होत्या.
हेही वाचा >>> मद्यधुंद मोटार चालकाची चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील मोटारीला धडक; पाटील अपघातातून बचावले
यावेळी फुटपाथवर बांगड्या विकणार्या या मुलीने त्यांना शिवीगाळ करुन तू पोलीस आहेस, म्हणून दादागिरी करीत आहेस का, असे मोठमोठ्याने आरडाओरडा केला. त्या ठिकाणी अडथळा होऊ नये, म्हणून त्यांना पोलीस ठाण्यात येऊन जात असताना उमा रणदिवे हिने फिर्यादी यांना धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणला. फिर्यादी यांच्या गणवेशाची कॉलर पकडून खाली खेचून शर्टाची दोन बटणे तोडून त्यांच्या शिलास हानी पोहोचवली. फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र तोडून नुकसान केले. त्यांच्याबरोबरच्या महिलेने “आंदेकरच्या ऑफीसला नेऊन तुला दाखवते मी कोण आहे ते,” अशी धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.