कचरा इतरत्र न टाकता कचराकुंडीत टाका, असे सांगितल्याच्या रागातून रेल्वेच्या महिला सफाई कामगारांवर कोयत्याने वार केल्याचा धक्कादायक प्रकार लोणावळ्यात घडला. या घटनेनंतर लोणावळा शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सचिन एकनाथ पवार (वय ३१, रा. आपटी, भोर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या

या प्रकरणी अलका राजू साबळे (वय ३८, रा. करंजगाव, मावळ) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अलका साबळे या लोणावळा रेल्वे स्टेशन येथे सफाई कर्मचारी आहेत. सकाळी त्या नेहमीप्रमाणे सफाईचे काम करत होत्या. या वेळी लोणावळा रेल्वे स्थानकाच्या बाजार भागातील रेल्वे उड्डाणपुलाच्या पायऱ्यावर सचिन पवार कचरा टाकत होता. त्यामुळे साबळे यांनी त्याला तेथे कचरा न टाकण्याबाबत समजावले.

हेही वाचा : पुण्यातील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या कामाला वेग

काही वेळानंतर पवार पुन्हा वाहन तळाच्या जागेवर कचरा टाकणारा दिसला. त्या वेळीही साबळे यांनी पुन्हा त्याला कचरा न टाकण्याबाबत सांगितले. या गोष्टीचा त्याला याला राग आला. त्याने त्याच्या जवळ असलेल्या पिशवीतील कोयत्याने अलका साबळे यांना मारहाण केली.मारहाणीत साबळे यांच्या डावा खांदा आणि डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी सचिन पवार याला अटक केली असून, या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील पोवार करीत आहेत.

Story img Loader