पिंपरी-चिंचवड: आधुनिकतेच्या काळात कुटुंबातील सदस्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. अनेक कुटुंबातील लहान बाळांना आजी- आजोबांचा आणि आई- वडिलांचा हवा तेवढा सहवास मिळत नाही. त्यामुळे लहान बाळांच्या संगोपनात अनेक समस्या उद्भवतात. बाळाला पूर्ण वेळ झोप मिळाली तर त्याची शारीरिक व बौद्धिक वाढ व्यवस्थित होते. प्रत्येक पालकांना आपल्या बाळाची उत्तम काळजी घेणे आवश्यक वाटते.

आई- वडील दोघेही नोकरी व्यवसायात व्यस्त असताना किंवा वर्क फ्रॉम होमच्या या काळात बाळाच्या वाढीमध्ये अनेक समस्या उद्भवतात. या समस्या सोडवण्यासाठी क्रेडलवाइज कंपनीने एक अत्याधुनिक, तंत्रज्ञान युक्त, स्वयंचलित आधुनिक पाळणा तयार केला आहे म्हणजेच द. क्रेडलवाइज. या पाळण्यात ठेवलेले बाळ जागे होऊन हालचाल करू लागले की, त्याची सूचना मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे पालकांना मिळते. बाळ रडण्यापूर्वीच पाळणा हळुवारपणे स्वयंचलित सुरक्षित झोके देण्यास सुरुवात करतो. त्याचे सर्व नियंत्रण दूरवरून मोबाईल द्वारे करता येते. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे बाळाच्या झोपेत व्यत्यय निर्माण होत नाही. यामध्ये अत्याधुनिक कॅमेरे आणि सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. या पाळण्याची सुरक्षाविषयक सर्व काळजी घेण्यात आलेली आहे. त्यामुळे या उत्पादनाला सुरक्षाविषयक अमेरिकेतील जेपीएमए आणि ग्रीनगार्ड हे प्रमाणपत्र मिळाले आहे.

बाळाच्या हालचाली ओळखून हा स्वयंचलित पाळणा बाळावर देखरेख ठेवतो आणि पालकांना मोबाईल ॲप्लीकेशन द्वारे सुचित करतो. हा पाळणा अचूकतेने, अगदी सूक्ष्म पद्धतीने काम करीत असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा आवाज होत नाही आणि पालकांना देखील आपला वेळ वाचवून कामात लक्ष देता येते, तसेच स्वतः ची देखील व्यवस्थित झोप घेता येते. क्रेडलवाइज हे जगातील पहिले एआय स्वयंचलित स्मार्ट क्रीब तंत्रज्ञान आता भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहे अशी माहिती कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक किरण ब्याहटटी यांनी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.