लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : मित्राच्या पत्नीला  जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पुणे पोलीस दलातील महिला पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आले .अनघा सुनील ढवळे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. ढवळेविरुद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ढवळे कोथरूड वाहतूक विभागात नियुक्तीस होती. दोन महिन्यांपुर्वी ढवळेविरुद्ध गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  झाला होता. याबाबत ३१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. ‘मी पुण्यातील स्थानिक आहे. माझी गुंडांबरोबर ओळख आहे. मी एक सामाजिक संस्था चालविते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काळा पैसा चलनात आणतो. आमचा संस्थेकडून नऊ कोटी रुपयांचा व्यवहार झाला. तुझ्या पतीला ४० ते ५० लाख रुपये मिळणार आहेत’, असे ढवळेने महिलेला सांगितले होते. ‘मी सांगेल तशी वागली नाही तर तुला ठार मारू’, अशी धमकी ढवळने महिलेला दिली होती.ढवळेविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर तिची चौकशी करण्यात आली. त्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमाेल झेंडे यांनी तिला पोलीस सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले.