पुणे : करोनानंतर राज्य सरकारने निर्बंधमुक्त उत्सवांची घोषणा केली असली, तरी स्वयंशिस्त महत्वाची आहे. दुसऱ्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने उत्सव साजरे करावेत, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री; चंद्रकांत पाटील यांनी केले. पुण्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल क्रिएटिव्ह फाउंडेशनचे आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान याच्या वतीने कोथरूड नवरात्र महोत्सवात पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त सतीश कोंडाळकर, कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल भेलके, उमेश भेलके, पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, श्वेताली भेलके, अक्षदा भेलके, कल्याणी खर्डेकर, उद्योगपती संजीव अरोरा, ग्लोबल ग्रुपचे मनोज हिंगोरानी, मुकुलमाधव फाउंडेशनचे सचिन कुलकर्णी, प्रवीण मसालेवालेचे संचालक विशाल चोरडिया आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले की, करोनानंतर मुक्त वातावरणात उत्सव साजरे करण्यात येत आहेत. राज्य सरकारने निर्बंधमुक्त उत्सवाची घोषणा केली असली, तरी स्वयंशिस्त महत्वाची आहे. दुसऱ्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने उत्सव साजरे करावेत.
पुण्याचे प्रलंबित प्रश्न सोडविणार
पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर पुण्याचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कालबद्ध नियोजन करणार आहे,असे पाटील यांनी सांगितले.