पिंपरी-चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी परिसरात प्लास्टिक आणि रबर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपरी- चिंचवड शहरातील सर्व अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. ७० टक्के आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक

हेही वाचा – ‘एमपीडीए’ कारवाई केलेल्या फरार गुंडाला लोणावळ्यातून अटक

भोसरी एमआयडीसीमध्ये रबर आणि प्लास्टिक बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचल आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ७० टक्के आग विझवल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. आगीने रौद्ररूप धारण केलं असल्याने उर्वरित ३० टक्के आग विझवण्यात अडथळा येत आहे. अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. काही किलोमीटर अंतरावरून धुरांचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. अद्याप आगीचं कारण अस्पष्ट आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fierce fire at company in pimpri chinchwad cause of fire unclear kjp 91 ssb