बारामती : बारामती नगर परिषदेतील स्वच्छतेचे काम करणाऱ्या सुमारे पन्नास महिला भगिनींना जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीने सन्मान करण्यात आला, अशी माहिती संयोजक विशाल जाधव यांनी दैनिक लोकसत्तेशी बोलताना दिली. बारामती शहर आणि परिसरामध्ये नगरपालिकेतील महिला स्वच्छते दैनंदिन काम करणाऱ्या सुमारे पन्नास महिला भगिनींना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाच्यावतीने चहा नाश्ता घेऊन त्यांच्या हातून केक कापून, औक्षण करून त्यांचा योग्य तो सन्मान करण्यात आला,
बारामती नगरपालिकेतील दैनंदिन स्वच्छतेचे काम करणाऱ्या प्रत्येक महिलांना एक फुलाचे झाड भेट म्हणून देऊन त्यांचा गौरवही करण्यात आला, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) पक्षाचे युवा कार्यकर्ते विशाल जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष अनिताताई गायकवाड, महिला कार्यकर्त्या मोहिनी जाधव, छाया गावडे, रेहाना शेख, योगेश नालंदे,सचिन मोरे, मन्सूर शेख, शंकर घोडे, अमर मिसाळ, अमर अवघडे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
बारामती नगरपालिकेतील दैनंदिन स्वच्छतेचे काम करणाऱ्या या महिलांचा सन्मान आणि सत्कार आज महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात आल्यामुळे या महिलांनी हा कार्यक्रम आयोजित केलेल्या आयोजकांचे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनापासून आभार मानले. बारामती मध्ये यापूर्वी कधीही बारामती नगरपालिकेतील दैनंदिन स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिलांचा असा यथोचित सन्मान आणि सत्कार कोणत्याही संघटने कडून केला गेला नव्हता, मात्र तो सन्मान व महिलांचा सत्कार, महिलांना भेटवस्तू म्हणून झाड दिल्याने या सर्व महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे संयोजकाचे मनापासून आभार मानून आपली कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली.