पुणे : पुण्यातील येरवडा कारागृहात पाच कैद्यांमध्ये सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस हवालदाराला पाच कैद्यांनी फरशीचे तुकडे आणि दगडांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हनुमंत श्रीमंत मोरे असे मारहाण करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील हॉस्पिटल सेप्रेट ७ जवळ असलेल्या बराक नंबर २७ ते ३१ या बराक जवळ मंगळवारी सकाळच्या सुमारास न्यायालयीन बंदी समीर शकील शेख, बंदी तरंग राकेश परदेशी, बंदी निलेश श्रीकांत गायकवाड, बंदी पुरुषोत्तम राजेंद्र वीर आणि बंदी देवा नानासो जाधव या पाच कैद्यांमध्ये भांडण सुरू होते ती घटना समजताच पोलिस हवालदार हनुमंत श्रीमंत मोरे हे भांडण सोडवण्यास गेल्यावर, त्या पाच कैद्यांनी हनुमंत श्रीमंत मोरे यांना फरशीचे तुकडे आणि दगडांनी मारहाण केली आहे.या घटनेत हनुमंत श्रीमंत मोरे जखमी झाल्याची घटना घडली असून या घटनेचा अधिक तपास येरवडा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक अशोक काटे करीत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fight between inmates at yerawada jail in pune police constable was also beaten crime pune tmb 01 svk