लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : उन्हाचा तडाखा आणि दुपारनंतर पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने पुणे आणि शिरूरमधील मतदार सकाळी लवकर मतदानासाठी बाहेर पडल्याचे चित्र आहे.दुपारी एक वाजेपर्यंत पुण्यात २६.४८ टक्के आणि शिरूरमध्ये २०.८९ टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पुण्यात सर्वाधिक मतदान कसब्यात ३१ टक्के, त्याखालोखाल कोथरूड विधानसभा मतदारसंघात २९.१० टक्के झाले आहे. पर्वतीमध्ये २७.१४ टक्के वडगाव शेरीमध्ये २४.८५ टक्के, पुणे कॅन्टोन्मेंट २३.२१ टक्के, शिवाजीनगर २३.२६ टक्के मतदान दुपारी एक वाजेपर्यंत मतदान झाले आहे.
आणखी वाचा-‘बारामती’ची मतदान यंत्रे ठेवलेल्या गोदामाचे सीसीटीव्ही बंद? काय आहे प्रकार?
शिरूरमध्ये सर्वाधिक भोसरीमध्ये २४.२७ टक्के, खेड-आळंदी २३.६ टक्के, हडपसरमध्ये २१.३७ टक्के, आंबेगाव १९.९९ टक्के, जुन्नर १९.७६ टक्के आणि शिरूर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी १५.२७ टक्के मतदान दुपारी एक वाजेपर्यंत झाले आहे.
दरम्यान, पुण्यात दुपारी एक वाजेपर्यंत कसबा विधानसभा मतदारसंघ आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे. कसब्यात रवींद्र धंगेकर आमदार आहेत. तर, कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी मतदानाचा जोर दिसून येत आहे.