पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबाॅल सामन्यादरम्यान हाणामारी झाल्याची घटना घडली. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना मारहाण केल्या प्रकरणी तेरा जणांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हेही वाचा – पोटनिवडणुकीबाबत अद्याप पक्षामध्ये चर्चा नाही; जयंत पाटील यांची भूमिका
हेही वाचा – पुणे: राष्ट्रवादी सरपंचाच्या हत्येप्रकरणी चार संशयित ताब्यात
या प्रकरणी अर्णव लोणकर, अभिषेक सिंग, सारंग डोनाडकर यांच्यासह तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत वीरेंद्र महेंद्र परदेशी (वय २२, रा. सहकारनगर) याने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबाॅल सामन्यातील उपांत्यफेरी सुरू होती. त्या वेळी चेंडूच्या ताब्यावरून वाद झाला. त्यानंतर वीरेंद्र परदेशी याच्या संघातील खेळाडूंना शिवीगाळ करण्यात आली. प्रतिस्पर्धी संघातील अकरा खेळाडू तसेच अर्णव लोणकर, अभिषेक सिंग, सारंग डोनाडकर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे परदेशी याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करत आहेत.