लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : शहरातील तिन्ही मतदारसंघातील बंडखोरी शमविण्यात महाविकास आघाडी आणि महायुतीला यश आले आहे. पिंपरीतून अपक्ष अर्ज दाखल केलेले शिवसेनेचे (ठाकरे) माजी आमदार गौतम चाबुकस्वार आणि भोसरीतून माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी माघार घेतली. दोघांनीही राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या उमेदवारांना पाठींबा दिला. तर, महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे यांनी चिंचवडमधून माघार घेत भाजपच्या शंकर जगताप यांना पाठिंबा दिला आहे. माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून पिंपरी, भोसरी, मावळमध्ये दुरंगी तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार आहे.

Former corporator of NCP Ajit Pawar group Nana Kate will contest as an independent
पिंपरी : चिंचवडमध्ये महायुतीत बंडखोरी, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नाना काटे अपक्ष लढणार
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Shiv Sainiks held a meeting and decided not to work as a candidate of Mahavikas Aghadi
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच काम करणार नाहीत, शरद पवारांनी शिवसेना संपवण्याचा डाव….;शिवसैनिक आक्रमक
article Shiv Sena MLA Shahaji Bapu Patil denies links to cash seizure
उलटा चष्मा : डोंगर, झाडी, बंडले…
kolhapur, maha vikas aghadi, mahayuti,
कोल्हापुरात आघाडी, महायुतीत बंडाचे झेंडे !
Sharad pawar demand supreme court to freeze clock,
‘घड्याळ’ चिन्हाबाबत उद्या सुनावणी; शरद पवार गटाची बाजू ऐकण्याची तयारी
India china agreement on patrolling along with lac in eastern Ladakh
अग्रलेख : सहमतीतील अर्थमती
Rebellion to Mahayuti and Mahavikas Aghadi in Purandar
पुरंदरमध्ये महायुती, महाविकास आघाडीला बंडखोरीचे ग्रहण

‘ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला उमेदवारी’ या महायुतीच्या ठरलेल्या सूत्रानुसार चिंचवड आणि भोसरी मतदारसंघ भाजपला तर पिंपरी मतदारसंघ राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला सुटला आहे. तर, महाविकास आघाडीत तिन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला सुटले आहेत. त्यामुळे तिन्ही मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाली होती. पिंपरीतून शिवसेनेचे (ठाकरे) माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. माघारीच्या दिवशी त्यांच्यासह २१ जणांनी माघार घेतली. १५ उमेदवार रिंगणात असून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या सुलक्षणा शिलवंत यांच्यात दुरंगी लढत होईल.

आणखी वाचा-दिव्यांग अपक्ष उमेदवाराने ‘या’ कारणामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची गाडी पेटवून दिली

चिंचवडमध्ये महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे माजी नगरसेवक नाना काटे यांनी बंडखोरी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर काटे यांनी माघार घेतली. सात जणांनी माघार घेतली असून २१ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे शंकर जगताप, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे राहुल कलाटे आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे बंडखोर भाऊसाहेब भोईर यांच्यात तिरंगी लढत होईल. भोसरीत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. परंतु, आमदार सचिन अहिर यांच्या मध्यस्थीनंतर लांडगे यांनी माघार घेतली. सात जणांनी माघार घेतली असून १४ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे उमेदवार आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे अजित गव्हाणे यांच्यात दुरंगी लढत होईल.

आणखी वाचा-पुण्यातील कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर या तीन मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी

मावळच्या रिंगणात सहाच उमेदवार

मावळमधून अंतिम दिवशी सहा जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे मावळच्या रिंगणात केवळ सहाच उमेदवार राहिले आहेत. एकूण १८ उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननी प्रक्रियेत सहा अर्ज बाद झाले होते. तर, सहा जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे सुनील शेळके विरुद्ध सर्वपक्षांनी पाठींबा दिलेले राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचेच बंडखोर महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले अपक्ष बापू भेगडे अशी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.