श्वानांमध्ये झालेल्या भांडणातून श्वानांच्या मालकांमध्ये वादावादी झाली. वादावादीतून एकाला श्वानाच्या पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात घडली. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.प्रतीक संतोष मदने (रा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत ओंकार संदीप बोत्रे (वय २१, रा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवक वसाहत) याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>>पुण्यात सायबर पोलीस ठाण्यांची संख्या वाढविणार; नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ग्वाही
ओंकार आणि प्रतीक हे श्वानाला फिरायला घेऊन बाहेर पडले होते. दोघांच्या श्वानांमध्ये भांडणे झाली. त्या वेळी प्रतीकने श्वानांचे भांडण सोडव, असे ओंकारला सांगितले. मी भांडणे सोडविणार नाही, असे ओंकारने त्याला सांगितले.या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. वादातून प्रतीकने श्वानाच्या चामडी पट्ट्याने ओंकारला बेदम मारहाण केली. ओंकारच्या डोक्यास दुखापत झाली. पोलीस नाईक रायकर तपास करत आहेत.