लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महत्वपूर्ण कागदपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्र तयार ठेवण्याबाबतच्या स्पष्ट सूचना राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिल्या. तसेच बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करून त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अभियांत्रिकी, वास्तुकला, हॉटेल मॅनेजमेंट, औषधनिर्माणशास्त्र, बीबीए-बीएमएस-बीसीए, एमबीए, एमसीए, एम.टेक अशा विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. त्यानुसार अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

आणखी वाचा-केंद्रीय विद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक; पैसे परत मागितल्याने आरोपीकडून जीवे मारण्याची धमकी

आवश्यक कागदपत्रांमध्ये सक्षम प्राधिकाऱ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठी प्राधिकृत केलेले जात-जमात प्रमाणपत्र, जात-जमात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्ग प्रमाणपत्र, दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र, आधार क्रमांक, नोकरदारांसाठी अनुभव प्रमाणपत्र आणि ना-हरकत प्रमाणपत्र अशा कागदपत्रांचा समावेश आहे. अधिक माहिती https://dte.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Filing of criminal cases against students who submit fake certificates warning of directorate of technical education pune print news ccp 14 mrj