पुणे : पुण्यात पकडलेल्या दोन दहशतवाद्यांकडून पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्याचे साहित्य जप्त केले आहे. त्याद्वारे त्यांनी शहरातील संवेदनशील ठिकाणांचे चित्रीकरण केल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) तपासात आढळून आले आहे. याबाबतचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा’शी संबंधित मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय २४), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय २३, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) या दोन दहशतवाद्यांचा दुचाकींमध्ये स्फोटके ठेवून स्फोट करण्याचा डाव होता, असे ‘एनआयए‘च्या तपासात आढळून आले आहे. या दहशतवाद्यांचा पुण्यात कोठे वावर होता, याची माहिती घेण्यात येत असून, त्यांच्याबरोबर असलेल्या मोहम्मद शहनवाज आलम (वय ३१) याचा शोध घेण्यात येत आहे.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
software exports maharashtra
‘आयटी’त पुण्याचा झेंडा! सॉफ्टवेअर निर्यातीत मुंबई, नागपूरपेक्षा अव्वल कामगिरी

खान, साकी यांच्याकडून बनावट आधारकार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढऱ्या रंगाच्या गोळय़ा, पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकीट, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुण्यात लष्कराचे दक्षिण मुख्यालय आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसह महत्त्वाच्या लष्करी, तसेच संशोधन संस्था आहेत. शहरातील संवेदनशील ठिकाणांची दोघांनी पाहणी केली असल्याचे ‘एनआयए’च्या तपासात आढळून आले आहे. त्या दृष्टीने त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

खान आणि साकी यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पांढऱ्या रंगाच्या गोळय़ा न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. हे दहशतवादी दीड वर्षांपासून येथे वास्तव्यास होते. घरमालकाने त्यांच्या भाडेकराराची नोंदणी केली नसल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. पोलिसांनी घरझडतीत एक काडतूस जप्त केले असून, पिस्तूल सापडलेले नाही. साकी आणि खान आयसिस या दहशतवादी संघटनेची उपसंघटना ‘सुफा’शी संबधित असून, ते जयपूर येथे बॉम्बस्फोट घडविण्याच्या तयारीत होते. स्फोटके बाळगल्याप्रकरणी एनआयएने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ते पसार झाले होते.

Story img Loader