ईशान्य भारतातील लोकजीवन, सांस्कृतिक वैविध्य, लोककला आणि खाद्यसंस्कृती यांचा एकत्रित अनुभव घेण्याची संधी एक ते तीन फेब्रुवारी दरम्यान भरणाऱ्या ‘फ्रॅग्रन्सेस ऑफ नॉर्थ ईस्ट’ महोत्सवातून रसिकांना मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि सिम्बायोसिस यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात ईशान्य भारतातील स्थानिक भाषांमध्ये तयार झालेले चित्रपट आणि माहितीपट दाखवण्यात येणार आहेत. महोत्सवाचे हे चौथे वर्ष असून यंदा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या कोथरूड येथील आवारात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आणि सिम्बायोसिसचे डॉ. शिरीष सहस्रबुद्धे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

प्रकाश मगदूम म्हणाले, ईशान्य भारतातील पंधरा चित्रपट यंदाच्या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. त्यातील बहुसंख्य चित्रपट या महोत्सवातून प्रथमच चित्रपट रसिकांसमोर येणार आहेत. मंजूल बरुआ, रीमा दास, डॉमिनिक संगमा, रूपा बरुआ यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलेले चित्रपट, माहितीपट ईशान्य भारतातील लोकजीवनाचा आरसा प्रेक्षकांना दाखवणार आहेत. गारो, खासी, आसामी, मिझो, मणिपुरी, सिल्हेटी आसामी अशा स्थानिक भाषांमध्ये हे चित्रपट तयार करण्यात आले आहेत.

डॉ. शिरीष सहस्रबुद्धे म्हणाले, केवळ ईशान्य भारतातून येथे स्थायिक झालेल्या नागरिकांनीच नव्हे तर सर्व चित्रपट रसिकांनी या महोत्सवाला उपस्थिती लावली असता उर्वरित भारत आणि ईशान्येकडील राज्ये यांतील दरी सांधण्यास मदत होणार आहे. ईशान्य भारतातील वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ, लोककला प्रकार आणि तेथील पर्यटन यांचे स्टॉल हे या महोत्सवाचे वैशिष्टय़ ठरणार आहे.