राज्यभरातून आलेल्या युवा रंगकर्मींच्या सळसळत्या ऊर्जेने पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शनिवारी उत्साहात सुरुवात झाली. कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ‘होतं असं कधी कधी’ या एकांकिकेने स्पर्धेची नांदी झाली. तरुणाईचा कलाविष्कार पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पुणे : भेंडी, काकडी, दोडका, तोतापुरी कैरीच्या दरात वाढ

महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेच्या वतीने आयोजित स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात दोन व सायंकाळच्या सत्रात तीन, अशा एकूण पाच संघांचे सादरीकरण झाले. यामध्ये ‘एम. जी. एस. एम. संचालित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा’ या संघांची ‘पडदा’, ‘फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी’ या संघाची ‘समाप्त’, ‘तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती’ या संघाची ‘भू भू’ आणि ‘कला व वाणिज्य महाविद्यालय, नागठाणे’ या संघाची ‘फराळ’ या एकांकिकांचा समावेश होता.

हेही वाचा >>> राज्यात तापमानाचा पारा घसरला; नाताळ आला गुलाबी थंडी घेऊन

स्पर्धेमध्ये रविवारी (२५ डिसेंबर) दोन सत्रांत प्रत्येकी चार संघांचे सादरीकरण तर, सोमवारी (२६ डिसेंबर) सकाळच्या सत्रात उर्वरित तीन संघांच्या एकांकिका सादर होतील. त्यानंतर सायंकाळच्या सत्रात निकाल जाहीर होऊन पारितोषिक वितरण होणार आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये विजयी ठरलेल्या १६ संघांमध्ये आता पुरुषोत्तम महाकरंडक पटकावण्यासाठी अंतिम फेरीत चुरस रंगते आहे.