लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च दरम्यान, तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक गुरुवारपासून (२ नोव्हेंबर) उपलब्ध होणार आहे.

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाने २८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा एक ते २२ मार्च या कालावधीत घेण्याचे नियोजन होते. या वेळापत्रकावर हरकती सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्या विचारात घेऊन राज्य मंडळाने अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यामुळे संभाव्य वेळापत्रक आणि अंतिम वेळापत्रक यात थोडाफार बदल झाल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा-अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलसह तिघा आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

राज्य मंडळाच्या अंतिम वेळापत्रकानुसार बारावीच्या सर्वसाधारण आणि द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाची परीक्षा २१ फेब्रवारी ते १९ मार्च या कालावधीत होणार आहे. याच कालावधीत व्यवसाय अभ्यासक्रमाचीही परीक्षा होणार आहे. तर माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा २० ते २३ मार्च या दरम्यान होणार आहे. बारावीची तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ ते २० फेब्रुवारी या दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत, तर तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० ते २९ फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे. दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक गुरुवारपासून राज्य मंडळाच्या https://www.mahasscboard.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहे.

छापील वेळापत्रकच अंतिम….

विद्यार्थ्यांनी अन्य कोणत्याही माध्यमातील वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये. परीक्षेपूर्वी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरुपात देण्यात आलेले वेळापत्रक अंतिम असेल. छापील वेळापत्रकावरून विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी, असेही मंडळाने स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Final time table of 10th and 12th exams has been announced pune print news ccp 14 mrj