पुणे : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे  (महाज्योती) केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ३१४ विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचा निकाल जूनमध्ये जाहीर झाला. त्यानुसार महाज्योतीमार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना एकरकमी ५० हजार रुपयांचे अर्थ साहाय्य देण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अंतर्गत ३५६ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यातील ३१४ विद्यार्थी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले. त्यापैकी २९८ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ५० हजार रुपयांप्रमाणे एकूण एक कोटी ४९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. तर उर्वरित पात्र विद्यार्थ्यांनी बँक तपशील सादर केल्यावर त्यांचे अर्थसाहाय्य वितरित करण्यात येणार असल्याची माहिती ‘महाज्योती’चे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Financial assistance to 314 candidates for upsc preparation by mahajyoti pune print news ccp 14 ysh
Show comments