लम्पी रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यासापूसन आतापर्यंत जिल्ह्यात ३०१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २९२ जनावरांच्या मालकांना प्रशासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे. उर्वरित पशुपालकांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या असून, त्या दूर करून त्यांनाही आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे.

हेही वाचा >>>पुणे: महामेट्रोचे एक पाऊल मागे; महामेट्रोकडून रस्ते दुरुस्तीच्या कामांना सुरुवात

SC to hear plea seeking safety measures for devotees at Mahakumbh on Feb 3
कुंभमेळ्यासंबंधी याचिकांवर आज सुनावणी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Three more gbs patients died Two deaths reported in Pune and one in Pimpri Chinchwad
पुण्यास पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जीबीएस’मुळे आणखी तिघांचा मृत्यू; राज्यातील रुग्णसंख्या १४० वर
state has 127 gbs patients with two deaths reported
‘जीबीएस’ची रुग्णसंख्या १३० अन् आतापर्यंत २ मृत्यू; आरोग्य सचिवांकडून यंत्रणांची झाडाझडती
mahakumbh vip arrangement
Mahakumbh: चेंगराचेंगरीत सामान्य भाविकांचा मृत्यू; दुसरीकडे VIP साठी विशेष व्यवस्था, इन्फ्लूएन्सरच्या व्हिडीओवर संताप
Sasoon Hospital Pune.
‘GBS’मुळे आणखी एक मृत्यू, पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात नोंद; राज्यातील रुग्णसंख्या १२७ वर
old woman died , teen Hat Naka area, Thane,
दूध आणण्यासाठी गेलेल्या वृद्धेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू, ठाण्याच्या तीन हात नाका भागातील घटना
Five peacocks and some birds died simultaneously in farm in Khairi near Kamathi
पाच राष्ट्रीय पक्ष्यांचा मृत्यू अन् बर्ड फ्ल्यू…

जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव कमी होत आहे. बाधित दर कमी झाला असून बाधित जनावरांची संख्या ७६२९ एवढी झाली आहे. आतापर्यंत आठ लाख ३२ हजार ९१२ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील लम्पी आजार नियंत्रणात असल्याने नगर आणि सातारा जिल्ह्यासाठी पाच डॉक्टरांना जिल्हा परिषदेकडून पाठविण्यात आले आहे. साखर कारखान्यांवर असलेल्या जनावरांसाठी कारखाना प्रशासनाला खबरदारीच्या उपाययोजना घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेकडून कारखान्यांवरील जनावरांचे देखील लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव दिसत असून जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत इंदापूर, खेड आणि बारामती तालुक्यात बाधा होण्याचे प्रमाण जास्त आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी दिली.

हेही वाचा >>>पुणे: महासाथीच्या काळात ४७ टक्के महिला कायमस्वरूपी बेरोजगार

लम्पीमुळे जनावरे दगावलेल्या पशुपालकांना आर्थिक साहाय्य देण्यात येत आहे. आतापर्यंत २९२ पशुपालकांना आर्थिक साहाय्य दिले असून उर्वरित जणांना लवकरच दिले जाईल. यापूर्वी लसीकरणामध्ये लहान वासरांना लस देण्यात आलेली नाही. मात्र, आता लहान वासरांचे देखील लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पशुपालकांनी त्यांच्याकडील लहान वासरांचे देखील लसीकरण करून घ्यावे, असेही विधाटे यांनी सांगितले.

Story img Loader