पिंपरी- चिंचवड: एलआयसीच्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करून जास्तीचा परतावा देण्याच अमिश दाखवून ५२ वर्षीय व्यक्तीची दोन लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात एलआयसी एजंट दीपक जाधव आणि एका महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ५२ वर्षे व्यक्तीने तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
५२ वर्षीय फिर्यादी यांना एलआयसी ऑफिस शिवाजीनगर पुणे ब्रँच मधून बोलत असल्याचे सांगून महिलेने एलआयसीच्या एन.बी.एफ.सी बॉण्ड प्लॅन आला असल्याचं फोन द्वारे सांगितलं. या प्लॅन बद्दल आमचे एलआयसी चे एजंट तुमच्या घरी येऊन अधिक माहिती देतील असं सांगितलं. एलआयसी एजंट दीपक जाधव यांनी फिर्यादीच्या घरी जाऊन त्यांना या प्लॅन बद्दल माहिती दिली.
या प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना जास्तीचा परतावा मिळेल. असे सांगून त्यांच्याकडून एक- एक लाखांचे दोन चेक घेतले. फिर्यादीच्या बँक खात्यातून एकूण दोन लाख रुपये इतर बँक खात्यात वळवण्यात आले. फिर्यादीला रिसीट म्हणून एक लिंक पाठवण्यात आली ज्यामुळे त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याच उघड झालं. या घटने प्रकरणी तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. ही घटना नोव्हेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ च्या दरम्यान घडली आहे.