एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास हा संदेश घेऊन चालणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचे २४ हजारांहून अधिक चालक अपघातमुक्त सेवा देण्यासाठी सज्ज आहेत. अपघाताची कारणे शोधून उपाययोजनांसाठी विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे, त्याचाच भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीमध्ये ११ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान सुरक्षितता मोहीम राबवली जात आहे. त्यात चालकांचे प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी, गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जाणार आहे.

हेही वाचा >>>पुणे : महाराष्ट्र केसरी गदेची परंपरा कायम राहणार, उद्यापासून स्पर्धेला सुरुवात

Mumbai nashik traffic jam
मुंबई – नाशिक महामार्गावर अपघात, वाहने बंद पडल्यामुळे कोंडी; खारेगाव टोलनाका ते नितीन कंपनीपर्यंत वाहनांच्या रांगा
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Accident involving private bus and container at Alephata on Pune Nashik National Highway pune news
खाजगी बस आणि कंटेनर यांच्यात धडक: सात जण गंभीर जखमी; पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आळेफाटा येथील घटना
kalyan rto provides special number for passenger complaints about overcharging or misbehaving rickshaw drivers
रिक्षा चालक जादा भाडे आकारतोय; डोंबिवली, कल्याणमधील प्रवाशांनो आरटीओकडे तक्रार करा
road accident on Mumbai Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात; ठाणे, भिवंडी कोंडले
st bus news in marathi
‘एसटी’चा प्रवास महागला, सुरक्षिततेचे काय? दोन वर्षांत ३०१ अपघात, ३५ जणांचा मृत्यू
Undisciplined drivers fined Rs 18 lakh 90 thousand Traffic Department takes action
बेशिस्त वाहनचालकांना १८ लाख ९० हजार रुपयांचा दंड; वाहतूक विभागाची कारवाई
Traffic police take action against vehicles engaged in illegal traffic in Vasai Virar city
बेकायदेशीर वाहनांवरील कारवाई जोरात, वाहनचालकांची पळापळ, नागरिकांना दिलासा

सध्या दररोज सुमारे ४० लाख प्रवाशांना दळणवळणाची सुरक्षित सेवा देणारी एसटी महाराष्ट्राची लोकवाहिनी बनली आहे. गेल्या ७५ वर्षात अविरत आणि सुरक्षित सेवा देण्याच्या दृष्टीने एसटी प्रयत्नशील आहे. प्रवाशांच्या विश्वासाला बळकटी देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळामध्ये दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरक्षितता मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेमध्ये चालकांचे प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी, गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जातो.

हेही वाचा >>>पुणे : पोलीस विभागातच चोरी करणारा गजाआड

सध्या महाराष्ट्रात एसटीमध्ये सुमारे २४ हजार ३८९ चालक कार्यरत आहेत. अपघाताची विविध कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने एसटीने चालकांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. चालकांना सुरक्षित प्रवासाचे महत्व पटवून देण्याबरोबरच त्यांचे मानसिक संतुलन सुदृढ करण्याच्या दृष्टीने आगार पातळीवर प्रबोधन देखील करण्यात येत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून गेल्या काही वर्षात इतर प्रवासी वाहनांच्या तुलनेत एसटीच्या अपघातांची संख्या कमी आहे. या सुरक्षितता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ‘प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी, वाहतुकीचे नियमाचे पालन, उत्तम शरीर प्रकृती आणि मन:स्वास्थ्य’ या चतुसुत्रीचे पालन करीत एसटीच्या चालकांनी यंदाच्या वर्षांमध्ये सर्वसामान्य जनतेला अपघात विरहित सेवा देण्याचे आवाहन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष,व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी केले आहे.

Story img Loader