रस्ते, सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता करणाऱ्यांकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ५० हजार रूपये दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच शहरात स्वच्छताविषयक विविध बाबींसाठी दंडाची तरतूद पालिकेने केली आहे. शहरवासीयांनी काटेकोर स्वच्छता राखावी, असे आवाहन पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
हेही वाचा >>>पुणे: राजभवनासमोर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वराज्य पक्षाची निदर्शने; पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात
स्वच्छताविषयक नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय पिंपरी पालिकेने ३१ मे २०२२ रोजीच घेतला होता. यापूर्वी ठरवण्यात आलेल्या दंडाच्या रकमेत आणखी वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी (२ डिसेंबर) पालिकेने याबाबतचे जाहीर प्रकटन केले आहे.
हेही वाचा >>>पुण्यात आढळला झिका विषाणूचा रुग्ण; ६७ वर्षीय व्यक्तीला बाधा
दंडाची रकम
जैववैद्यकीय घनकचरा हा सामान्य कचऱ्यात किंवा रस्त्यावर टाकल्यास – ३५ हजार रूपये
विलगीकरण न केलेला; तसेच वेगळ्या डब्यांमध्ये साठवण न केलेला कचरा आढळून आल्यास – ३०० रूपये
मोठ्या प्रमाणात कचरा करणाऱ्या घटकांना – ५ हजार रूपये
सार्वजनिक सभा किंवा समारंभ संपल्यानंतर चार तासांच्या आत स्वच्छता न केल्यास – १० हजार रूपये
डासोत्पत्ती स्थानांची निर्मिती केल्यास – १० हजार रूपये
मोठ्या प्रमाणात कचरा जाळल्यास – २५ हजार रूपये
प्लास्टिकचा वापर केल्यास – ५ हजार रूपये
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास – १ हजार रूपये
उघड्यावर लघुशंका केल्यास – ५०० रूपये
सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्यास – ५ हजार रूपये
नागरिकांना अस्वच्छता करण्यापासून परावृत्त करण्यासाठी दंड रकमेत वाढ करण्यात आली आहे. नागरिकांकडून स्वच्छतेची जोपासना व्हावी, असा महापालिकेचा हेतू आहे. नागरिकांनी स्वच्छता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.-शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी पालिका