जंगल भागात फोफावलेला नक्षलवाद पुण्या-मुंबई सारख्या शहराज फोफावण्यापूर्वीच तो समूळ नष्ट करण्यात यावा, अशी मागणी आमदार मोहन जोशी यांनी विधानपरिषदेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली.
पुण्यात विविध ठिकाणी शहीद दिनाच्या निमित्ताने बंदी घातलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) या नक्षलवाद्यांशी संबंधित संघटनेने पत्रके लावली होती. ही पत्रके लावताना पत्रकार संघ येथील सीसीटीव्ही चित्रीकरणात तिघेजण कैद झाले होते. याबाबतचे ‘लोकसत्ता’ ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन जोशी यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे प्रश्न उपस्थित करून शहरात नक्षलवाद फोफवण्यापूर्वीच समूळ नष्ट करण्याची मागणी केली आहे. याबाबत शासनाने गांभीयाने तत्काळ कार्यवाही करून या समस्येवर उपाययोजना करावी, अशी विनंती केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा