पिंपरी : करोना उपचारासाठी सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक पैसे वसूल करणाऱ्या चाकण येथील क्रिटिकेअर रुग्णालयाच्या डॉक्टरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या संदर्भात चाकण येथील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. नंदा गणपत ढवळे (वय ५८) यांनी शनिवारी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी डॉ. स्मिता घाटकर, डॉ. राहुल सोनवणे, डॉ. सीमा गवळी आणि डॉ. घाटकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिटिकेअर रुग्णालयात करोना बाधित रुग्ण विजय लक्ष्मण पोखरकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या नातेवाइकाकडून सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्तीचे पैसे घेतले. या संदर्भात फिर्यादीने वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. अधीक्षकांनी रुग्णालयाच्या संचालकांना रुग्णाच्या उपचारासाठी बेकायदेशीरपणे वसूल केलेली रक्कम परत करण्याचे आदेश दिले. परंतु रुग्णालय प्रशासनाने ती परत केली नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir against doctor who charges more for corona treatment zws
Show comments