पुणे : वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांविषयी वादग्रस्त विधान केल्याननंतर संतप्त प्रतिक्रिया उमटली होती.
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे (वय ४९) यांनी याबबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय शिबिर शिर्डीत नुकतेच पार पडले. या शिबिरात आव्हाड यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. प्रभू श्रीराम वनवासात मांसाहार करत असल्याचे आव्हाड यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले. त्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटली.
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा : ‘राम मांसाहारी होता’, वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम, म्हणाले; “वाल्मिकी रामायणातला तो उल्लेख…”
आव्हाड यांनी वादग्रस्त विधान केले. २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी वादग्रस्त विधान करुन धार्मिक भावना दुखावल्या, असे घाटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.