पुण्यातील आंबेगाव येथील सिंहगड कँम्पसची संरक्षकभिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू तर नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याप्रकरणी जागा मालक, इमारत विकासक, ठेकेदार, सिंहगड इन्स्टिटय़ुटचे सौ वेणूताई चव्हाण तंत्र निकेतन कॉलेज, आंबेगाव बुद्रुक पुणेचे व्यवस्थापक, बांधकाम विभागाचे काम पाहणारे अधिकारी यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे.
Pune: An FIR has been registered against the Builder, land owner, contractor and officials of Sinhgad College, Ambegaon, in connection with wall collapse incident that occurred, today. 6 labourers had died and 3 were injured in the incident. (File pic) pic.twitter.com/xCkwkByEMc
— ANI (@ANI) July 2, 2019
या घटनेत ठार झालेले मजूर छत्तीसगढचे रहिवासी असल्याची माहिती आहे. तर घटनेनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी करण्यात आली होती.