पिंपरी महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्याविरुध्द नाशिकच्या संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका विवाहित महिलेशी गायकवाड यांचे अनैतिक संबंध होते, त्या संबंधांना वैतागून तिच्या पतीने आत्महत्या केल्याचा आरोप गायकवाड यांच्यावर आहे. या घटनेचे पडसाद पालिका सभेतही उमटले.
नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेली व्यक्ती संगमनेरची होती. तो नोकरीनिमित्त पुण्यात राहत होता. गायकवाड यांचे त्याच्या घरी येणे-जाणे होते. त्यातून गायकवाड व त्याच्या पत्नीचे सूत जुळले. ही माहिती तिच्या पतीला समजली. त्याने गायकवाड यांना समजावून सांगितले. काही मित्रमंडळींना मध्यस्थी घातले. तरीही हे प्रकरण सुरूच राहिले. आमच्या संबंधात अडथळा आणल्यास कायमचा काटा काढू, अशी धमकी गायकवाडांनी दिली होती. या पाश्र्वभूमीवर, पत्नीच्या अनैतिक संबंधास कंटाळून त्या इसमाने आत्महत्या केली. तत्पूर्वी, त्याने चिठ्ठी लिहून ठेवली, त्यात पत्नी व गायकवाड यांच्या संबंधांना कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. नाशिक येथील संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून गायकवाड व ती महिला फरार आहे.
दरम्यान, गायकवाड गेल्या २० दिवसांपासून गायब आहेत. सुरूवातीला ते आजारी असल्याचे व नंतर नवीन कोर्स करत असल्याचे सांगण्यात येत होते. नाशिक येथे वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची माहिती िपपरी पालिकेपर्यंत पोहोचली. हा विषय शुक्रवारी दिवसभर चर्चिला जात होता.
पिंपरी पालिकेचे जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्यावर गुन्हा
विवाहित महिलेशी गायकवाड यांचे अनैतिक संबंध होते, त्या संबंधांना वैतागून तिच्या पतीने आत्महत्या केल्याचा आरोप गायकवाड यांच्यावर आहे.
आणखी वाचा
First published on: 27-07-2013 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fir on kiran gaikwad against immoral relations