सोमवार पेठेतील १५ ऑगस्ट चौकातील फर्निचर दुकानाला दुपारी आग लागली. आगीत फर्निचर जळून भस्मसात झाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.१५ ऑगस्ट चौकात दुपारी तीनच्या सुमारास एका फर्निचर दुकानात आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
हेही वाचा >>>पुणे: नागरी सेवा संयुक्त परीक्षा २०२३ द्वारे ६७३ पदांची भरती प्रक्रिया; ४ जूनला ३७ जिल्हा केंद्रावर पूर्व परीक्षा
तासाभरानंतर आग आटोक्यात आली. आगीत लाकडी फर्निचर जळून भस्मसात झाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.