पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात फर्निचर गोदामात गुरुवारी सकाळी आग लागली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. लोणी काळभोर भागात बोरकर वस्ती सुरक्षा डोअर गोदाम आहे. गोदामात लाकडी सामान ठेवण्यात आले आहे. गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास गोदामात आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. लाकडी साहित्य पेटल्याने मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. जवानांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. गोदामाची जवानांनी पाहणी केली. गोदामात कोणी नसल्याची खात्री जवानांनी केली.

लोणी काळभोर, हडपसर-सासवड रस्त्यावर ऊरळी देवाची परिसरात अनेक कंपन्यांची गोदामे आहेत. गोदामात आग लागल्याच्या घटना या भागात सातत्याने घडतात. दरम्यान, खडकमाळ आळीत क्रीडा चषक निर्मिती करणाऱ्या कारखान्यात बुधवारी रात्री आग लागली. रस्ते खोदाईमुळे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचण्यास विलंब झाला. जवानांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली.

ulta chashma Eknath shinde
उलटा चष्मा : ‘फिरते’बिरते काही नकोच!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
fire broke out at scrap warehouse at Kudalwadi in Chikhli on Monday morning
पिंपरी : चिखलीतील गोदामांच्या आग प्रकरणी जागा मालकाचा शोध
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
evm machines scam loksatta news
मारकडवाडी ठरतेय राज्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र
massive fire breaks out at bamboo godown in vasai
कामणच्या बेलकडी येथे बांबूच्या गोदामाला भीषण आग; वसईत अवघ्या तीन तासात दुसरी आग दुर्घटना

हेही वाचा… पिंपरी- चिंचवड औद्योगिक नगरीत बंद कंपनी फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; २४ लाखांचं तांबं जप्त

हेही वाचा… पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप, काँग्रेससह मनसेही रिंगणात

खडकमाळ आळी परिसरातील भाजी मंडईजवळ क्रीडा चषक निर्मिती कारखाना आहे. बुधवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास कारखान्यात आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. भाजी मंडईकडे जाणारे रस्ते अरुंद असून तेथे खोदाई सुरू असल्याने अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचण्यास विलंब झाला. स्वारगेट पोलीस वसाहत परिसरातील रस्त्याने बंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन अधिकारी प्रशांत गायकर, सुनील नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून अर्धा तासात आग आटोक्यात आणली.

Story img Loader