लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : उपहारगृहातील भटारखान्यात गॅस गळती होऊन आग लागल्याची घटना लष्कर भागात रविवारी घडली. भटारखान्यातील कामगार बाहेर पळाल्याने अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

लष्कर भागात सरबतवाला चौकात साहिल हॉटेलच्या भटारखान्यात दुपारी साडेतीनच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. भटारखान्यातील कामगार त्वरित बाहेर पडल्याने अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून तातडीने आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

आणखी वाचा-पुणे : बेकायदा सावकारीचा बळी; सोमवार पेठेत तरुणाची आत्महत्या

अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर, रोहित रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आग शमावली. भटारखान्यातील चार सिलिंडर बाहेर काढण्यात आल्याने गंभीर दुर्घटना टळली. एक सिलिंडरमधून गॅस गळती झाल्याने आग लागल्याचे गायकर यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire at lashkar area hotel disaster was averted as the workers ran away pune print news rbk 25 mrj
Show comments