लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : कसबा पेठेतील जुन्या लाकडी वाड्याला पहाटे आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. वाडा बंद असल्याने गंभीर दुर्घटना टळली.
आणखी वाचा-‘वंदे भारत’मधील प्रवास आणखी सुखकर! जाणून घ्या नवीन तंत्रज्ञानासह नेमके काय बदल…
कसबा पेठेतील शनिवारवाडा परिसरात पेशवेकालीन मोटे वाडा आहे. मोटे वाड्यापासून काही अंतरावर महाजन वाडा आहे. महाजन वाडा लाकडी आहे. पहाटे महाजन वाड्याला आग लागली. वाडा लाकडी असल्याने आग भडकली. या घटनेची माहिती कसबा पेठेतील अग्निशमन दलाच्या केंद्राला मिळाली. लाकडी वाडा असल्याने आग भडकण्याची शक्यता होती. त्यामुळे जवानांनी तातडीने पाण्याचा मारा सुरु केला. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख कमलेश चौधरी आणि जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.