लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: वडगाव शेरी भागात रंगाचे डबे असलेल्या गोदामास आग लागली. रंग तसेच रसायानांनी पेट घेतल्यानंतर आग भडकल्याने मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आग आटोक्यात आणली.

वडगाव शेरी भागातील एका गोदामात मोठ्या प्रमाणावर रंगाचे डबे ठेवण्यात आले होते. शनिवारी दुपारी गोदामातून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागल्याने नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या येरवडा अग्निशमन केंद्र, नायडू रुग्णालय केंद्रातील बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग भडकली होती. केंद्र प्रमुख सुभाष जाधव, प्रमोद सोनवणे, विजय भिलारे आणि जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. गोदामात कोणी नसल्याने अनर्थ टळला. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire at paint godown in vadgaon sheri get under control within an hour pune print news rbk 25 mrj