पिंपरी चिंचवड येथील कुदळवाडी परिसरातील भंगारच्या गोदामाला आणि दुकानांना मंगळवारी (दि.१८) रात्री भीषण आग लागली होती. या आगीत २० ते २५ गोदाम आणि भंगाराची दुकाने जळुन खाक झाली आहेत. आग इतकी भीषण होती की, ती विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे ८ व पाण्याचे ८ टँकरचा वापर करावा लागला. ही आग बुधवारी पहाटे विझविण्यात यश आले. या आगीत लाखो रूपयांचे साहित्य भस्मसात झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास कुदळवाडी परिसरात गोदामाना आणि भंगारच्या दुकानांना भीषण आग लागली होती. या आगीमध्ये तब्बल २० ते २५ दुकाने आणि गोदाम जळून खाक झाले आहेत. ही आग एवढी मोठी होती कि अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि आठ पाण्याचे टँकर असताना देखील विझविण्यास पहाट झाली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भंगारच्या दुकानात आणि गोदामात थर्माकॉल आणि प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीने क्षणाधार्त रौद्ररूप धारण केले होते
कुदळवाडी परिसरात भंगारची दुकाने आणि गोदाम असल्याकारणाने या ठिकाणी नेहमी आग लागत असते. काही दिवसांपूर्वीच या परिसरातीलच भंगार दुकानांना भीषण आग लागली होती. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. नागरी वस्तीत हा भाग असल्याने याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागतो. भविष्यात आग या नागरी वसाहतीत पसरली तर मोठी जीवित व वित्त हानी होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
fire broke out at scrap warehouse at Kudalwadi in Chikhli on Monday morning
पिंपरी : चिखलीतील गोदामांच्या आग प्रकरणी जागा मालकाचा शोध
Demand to the judges to withdraw the ban on single use plastic in the court premises Mumbai print news
न्यायालयाच्या आवारातील एकेरी वापराच्या प्लास्टिकवरील बंदी मागे घ्या; वकील संघटनेची मुख्य न्यायमूर्तींकडे पत्रव्यवहाराद्वारे मागणी
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
massive fire breaks out at footwear shops in virar
विरारमध्ये चप्पल दुकानांना भीषण आग; आगीत तीन दुकाने जळून खाक
delhi school bomb hoax
४० हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या, पालकांच्या चिंतेत वाढ; नेमकं प्रकरण काय?
house damaged by falling tree branch in goregaon
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान

Story img Loader