टिळक रस्त्यावर कॉसमॉस बँकेत मध्यरात्री आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. पाच मजली इमारतीच्या तळमजल्यावर कॉसमस बँकेमधे आग लागली. जवानांनी आत प्रवेश करुन कोणी आतमध्ये अडकले नसल्याची खात्री करत पाण्याचा मारा सुरू करुन आग दहा मिनिटात विझवली; परंतु मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाल्याने अग्निशमन दलाकडील यंत्राचा वापर करुन धूर पूर्णपणे बाहेर काढला.

हेही वाचा >>> सोलापूर रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेने महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू , गावी परतताना काळाचा घाला; दोन तरुण जखमी

आगीमधे बँकेतील कॅश काऊंटर, फर्निचर, पैसे मोजायचे मशीन, संगणक, खुर्ची इत्यादी साहित्य जळाले असून आग क्ष शॉर्टसर्किटमुळे लागली असा प्राथमिक अंदाज आहे. या कामगिरीत अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर वाहनचालक बजरंग लोखंडे, ज्ञानेश्वर खेडेकर आणि तांडेल संजय जाधव, जवान निलेश माने, किशोर बने, राकेश नाईकनवरे यांनी सहभाग घेतला.

Story img Loader