लोणावळा : पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगदा परिसरात पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकला पहाटे तीनच्या सुमारास अचानक आग लागल्याने ट्रक जळाला. शॉर्ट सर्किटमुळे गाडीला आग लागल्याचे निदर्शनास येताच चालकाने गाडी बाजूला घेतली. ही माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा आणि खोपली नगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. चालक आणि त्याचा सहकारी दोघांनाही बाहेर काढण्यात यश आले. वाहतूक पोलीस बोरघाट, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यावेळी मदत कार्यात व्यस्त होते. सुदैवाने या अपघातात अन्य वाहने बाधित झाली नाहीत. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर धावत्या ट्रकला आग
शॉर्ट सर्किटमुळे गाडीला आग लागल्याचे निदर्शनास येताच चालकाने गाडी बाजूला घेतली.
Written by लोकसत्ता टीम
पुणे
First published on: 28-10-2022 at 13:33 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire at running truck in pune mumbai express way adoshi tunnel lonavala pune print news tmb 01