पुण्यातील कोथरुड येथील आशिष गार्डन जवळील श्रावणधारा सोसायटीच्या आठव्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. सोसायटीमधील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि एक पाण्याचा टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.
अग्निशामक विभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड येथील आशिष गार्डन जवळ असलेल्या श्रावणधारा सोसायटीमधील आठव्या मजल्यावर आग लागल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा: पुणे: उच्च शिक्षण संचालकपदी डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची नेमणूक

या घटनेची माहिती मिळताच आम्ही काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाल्यावर, सोसायटीमधील आठव्या मजल्यावरील आगीच्या ठिकाणी चार ही बाजूने पाण्याचा मारा करण्यास सुरुवात केली. इमारतीमधील ९ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. तसेच या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू असून ही आग कशामुळे लागली हे अद्यापपर्यंत समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire at shravandhara society kothrud fire brigade vehicles reached the spot pune tmb 01 svk