पुण्यातील बुधवार पेठ भागात असलेल्या श्रीकृष्ण टॉकीजला आग लागल्याची घटना आज संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत
टॉकीजचा भाग पूर्णपणे जळाला आहे अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेमधील श्रीकृष्ण टॉकीज हे गेल्या काही महिन्यापासून बंद होते. आज संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. या आगीच्या घटनेत टॉकीज मधील आतील भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या टॉकीजला आग लागण्याचे कारण काय ते स्पष्ट झालेले नाही असेही सांगण्यात आले.

 

Story img Loader