पुण्यातील तुळशी बागेत पुणेकर नागरिकांची खरेदीसाठी कायम गर्दी असते. मात्र संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एका प्लास्टिकच्या फुलाच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे या परिसरातील नागरिकांची पळापळ झाली. मात्र काही क्षणात अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आग आटोक्यात आणली असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळशी बागेतील दोन मजली प्लास्टिक फुलांच्या दुकानाला दुसर्‍या मजल्यावरील काही भागाला आज संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच काही क्षणात घटनास्थळी सहा गाड्या पोहोचल्यानंतर काही मिनिटामध्ये आग आटोक्यात आणली आहे. तर ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.