पुणे : भांडारकर रस्ता परिसरात असलेल्या ‘करण सोहेल’ या सात मजली इमारतीच्या गच्चीवर आग लागल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वीस मिनिटांत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बुधवारी दुपारी एकच्या सुमारास गच्चीवर असलेल्या कार्यालयात आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. कार्यालयात कोणी अडकले नसल्याची खात्री करण्यत आली.

हेही वाचा…Pune Porsche Crash : “डॉ. अजय तावरेंच्या जीवाला धोका”, सुषमा अंधारेंनी आर्यन खान प्रकरणाचा हवाला देत म्हटले…

करण सोहेल इमारतीत व्यावसायिकांची कार्यालये आहेत. आग न पसरण्यासाठी जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा मारा सुरू केला. अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे, केंद्रप्रमुख गजानन पाथ्रुडकर, राजेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून वीस मिनिटात आग आटोक्यात आणली. गच्चीवर पत्रे आणि स्लायडिंगचा वापर करून कार्यालय बांधण्यात आले आहे. आग लागण्यामागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली.