लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : हडपसर येथील महंमदवाडी भागात एका भंगारच्या गोदामात सकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.
या घटनेची माहिती मिळताच तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. तिथे एका पत्र्याचे बांधकाम असणाऱ्या भंगार मालाच्या गोदामात आग लागून मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. जवानांनी आत प्रवेश केला. जवानांनी पाण्याचा मारा करुन पंधरा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. आग पसरु न देता धोका टाळला. या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र मोठ्या प्रमाणात कचरा पेटला होता.
आणखी वाचा-पंतप्रधानांच्या सभास्थळाला छावणीचे स्वरूप… पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त…
अग्निशमन अधिकारी अनिल गायकवाड, उत्कर्ष टिळेकर , तांडेल महेंद्र कुलाळ, राहुल बांदल, विजय चव्हाण, महेश फडतरे, संकेत शिंदे, परेश पवार, प्रसाद शिंदे, संतोष माने यांनी आग आटोक्यात आणली.