कोंढवा परिसरात एका बहुमजली इमारतीत अकराव्या मजल्यावर असलेल्या सदनिकेत मंगळवारी दुपारी आग लागली. आग लागल्यानंतर रहिवासी भयभीत झाली. इमारतीच्या गच्चीवर रहिवासी पळाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाऊण तासात आग आटोक्यात आणली. कोंढव्यातील महंमदवाडी परिसरात दिल्ली पब्लिक स्कूलजवळ बहुमजली इमारत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> महापालिकेने जप्त केलेल्या मिळकती विकत घेण्यास कोणीच येईना… जाणून घ्या का?

इमातीत अकराव्या मजल्यावर असलेल्या सदनिकेतून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाला कळविली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अकराव्या मजल्यावरील सदनिकेत लागलेली आग भडकल्याने रहिवासी भयभीत झाले. रहिवासी घाबरून इमारतीच्या अकराव्या मजल्यावर गेले. घटनास्थळी पाच बंब आणि उंच शिडीचे वाहन दाखल झाले होते. जवानांनी पाण्याचा मारा करून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire broke out in 11th floor of multi storey building in kondhwa area pune print news rbk 25 zws