लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पुणे स्टेशन परिसरातील एका दुकानाला पहाटे आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. दुकानाच्या परिसरातील एका लॉजमधील प्रवाशांची जवानांनी सुखरुप सुटका केली.
पुणे स्टेशन परिसरातील विल्सन गार्डन परिसरात लॉज आहे. लॉजच्या इमारतीत अगरवाल जनरल स्टोअर्स आहे. शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दुकानातून मोठ्या प्रमाणाव धूर येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब आणि दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आगीत दुकानताील साहित्य जळाले. मोठा धूर झाल्याने घबराट उडाली. जवानांनी लॉजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका केली.
आणखी वाचा-कृषी क्षेत्राबाबत मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय
आगीत दुकानातील साहित्य जळाले असून, सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही. प्राथमिक चौकशीत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पंधरा दिवसांपूर्वी वडगाव शेरीतील बाजारपेठेत पाच दुकानांना आग लागल्याची घटना घडली होती.