लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : सासवड रस्त्यावरील मंतरवाडी भागांतील रंगाच्या गोदामाला मध्यरत्री आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी हानी झाली नाही. मंतरवाडी भागात गोदामाला आग लागल्याची माहिती अग्नीशमन दलाला मिळाली.
पंधरा हजार सातशे स्क्वेअर फुट आणि अंदाजे दहा फुट भिंत असलेले गोदामातील रंगाच्या डब्यानी पेट घेतला होता. जवानांनी तातडीने आगीवर चारही बाजूने पाण्याचा मारा सुरु केला.आतमध्ये कोणी नसल्याची खात्री केली .आगीवर सुमारे तासाभरात नियंत्रण मिळवले. आगीमध्ये वाहने, औद्योगिक, घरगुती कामासाठी वापरला जाणारा रंगाला मोठी आग लागली होती.. आगीच्या तीव्रतेने पत्र्याचे शेड मोठे लोखंडी गज वाकले गेले तसेच तेथील दोन टेम्पो आणि दोन दुचाकी वाहने जळाली. गोडाऊनमधील रंग वातानुकूलित यंत्रणा, फर्निचर, संगणक आदी सामान पुर्णपणे जळाले असून मोठे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. निपॉन कंपनीचे गोदाम असल्याची माहिती अग्नीशमन दलाने दिली.
आणखी वाचा-पक्षातील बंडखोरीचे काँग्रेस समोर आव्हान!
अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे, अनिल गायकवाड यांच्यासह सुमारे ५० जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. काळेपडल, हडपसर, बीटी कवडे रोड, कोंढवा, मध्यवर्ती, पीएमआरडीए, अमनोरा अग्निशमन केंद्रातील अग्निशमन वाहने, टँकर आणि खाजगी दहा टँकर दाखल झाले होते.