पिंपरी-चिंचवडच्या कुदळवाडी येथे भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली. या गोदामातील प्लॅस्टिक आणि रबरी वस्तूंच्या साठ्यामुळे आग पसरली. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दुपारी तीनच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडीत गोदामाला लागलेल्या आगीची झळ परिसरातील चार गोदामे आणि इतर दहा दुकानांना बसली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  या ठिकाणी अग्निशमन दलाच्या सात गाड्या आणि दोन खासगी टँकरने आग विझवण्याचे काम सुरू आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. यापूर्वीही या परिसरात आगीच्या घटना घडल्या आहेत.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire broken scrap material store in pimpari chinchwad