पुणे : सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द भागात सजावट साहित्याच्या गोदामाला सोमवारी सायंकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. रहिवासी भागात गोदाम असल्याने आटोक्यात आणताना अडथळे आले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाली नाही.

सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरात बेंद्रे इव्हेंट मॅनजमेंटचे गोदाम आहे. या गोदामात मोठ्या प्रमाणावर सजावट साहित्य ठेवण्यात आले आहे. गोदामाची जागा जगताप यांच्या मालकीची असून, गोदामाच्या परिसरात दाट वस्ती आहे. सोमवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास गोदामातून माेठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाला कळविली. गोदामातील गालिचे, सजावट साहित्याने काही क्षणात पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्राचे प्रमुख प्रभाकर उमराटकर, नवले पूल अग्निशमन केंद्राचे प्रमुख प्रकाश गाेरे, वाररजे अग्निशमन केंद्राचे प्रमुख सचिन मांडवकर यांच्यासह जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. गोदामातील साहित्याने पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. गोदामाच्या परिसरात रहिवासी भाग आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
Pune Video
Pune Video : “पुण्यासारखं सुख कुठेच नाही!” एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच
traffic jam on pune Bengaluru highway
पुणे – बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या रांगाच रांगा
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल

हेही वाचा – पुणे : दिवाळीत ६० ठिकाणी आगीच्या घटना

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड, मावळमधील लढतीचे चित्र स्पष्ट; ‘अशा’ होणार लढती

चिंचोळ्या गल्लीतून मार्ग काढून जवानांनी पाण्याचा मारा करुन अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. जवानांनी गोदामाची पाहणी केली. गोदामात कोणी अडकले नसल्याचे उघडकीस आले. गोदामातील सजावट साहित्य जळून भस्मसात झाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख प्रभाकर उमराटकर यांनी दिली.

Story img Loader